सेरेना, हालेप उपांत्य फेरीत, विम्बल्डन टेनिस स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स व माजी नंबर वन खेळाडू सिमोना हालेप या दोघींनी विम्बल्डन टेनिस या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची महिला एकेरीचीं उपांत्य फेरी गाठली.

सेरेना विल्यम्स हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एलिसन रिस्कवर 6-4, 4-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सिमोना हालेप हिने चीनच्या झँग शुई हिच्यावर 7-6, 6-1 अशा फरकाने विजय मिळवत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली.

10 हजार डॉलर दंड

सेरेना विलियम्सला एक टेनिस कोर्टचे आपल्या रॅकेटने नुकसान केल्याच्या प्रकारावरून 10 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑल इंग्लंड क्लबने सेरेनाचा बेताल वर्तनाबद्दल ही दंडाची शिक्षा सुनावली.