सिरम सर्व्हायकल कॅन्सरवर लसीचे उत्पादन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणारे पुण्याचे सिरम इन्स्टिटय़ूट आता महिलांच्या सर्व्हायकल कॅन्सरला आळा घालणाऱया लसीचे उत्पादन करणार आहे. देशाच्या औषध नियंत्रण महासंचालक (डीसीजीआय) यांनी सिरमला लस उत्पादन करायला परवानगी दिली असून ही लस संपूर्ण देशी आहे.

या वर्षीपासून लसीचे उत्पादन केले जाणार आहे. दरम्यान, ही लस अत्यंत माफक दरात सर्वत्र उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली.