सामोपचाराने तोडगा काढा, सत्र न्यायालयाची संजय राऊत व मेधा सोमय्यांना सूचना

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत उभय पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचा विचार करावा, अशी सूचना सत्र न्यायालयाने बुधवारी केली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ही सूचना केली. संजय राऊत यांच्याशी याबाबत चर्चा करून न्यायालयाला माहिती दिली जाईल, असे अॅड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयाला सांगितले. सोमय्या यांचे वकील लक्ष्मण कुणाल यांनीदेखील हीच भूमिका मांडली. यासाठी वेळ देत न्यायालयाने ही सुनावणी 18 ऑगस्ट 2025पर्यंत तहकूब केली.