
तब्बल सात महिन्यांनंतर शेअर बाजार सोमवारी गडगडला. सेन्सेक्स 1170 अंकांनी कोसळून 58465वर बंद झाला. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याने सरकारी कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम जाणवला. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा सऊदी अरामकोशी करार फिसकटल्याचा आणि देशातील वाढलेली महागाई आणि काही देशांमधील कोरोनाचा, लॉकडाऊन याचाही एकत्रित परिणाम शेअर बाजारावर झाला. रिलायन्सचा शेअर 4 टक्के, बजाज फायनान्स 6, बजाज फिनसर्व 5 आणि पेटीएमचा शेअर 4 टक्क्यांनी घसरला.
























































