अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याला भलमोठं भगदाड, रस्ता खचून पडला 20 फूट खोल खड्डा

मुंबईतील शिवडी येथून अटल सेतूला जाणारा रस्ता खचून त्याला मोठं भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर रस्ता खचून त्या जागी 20 फूट खोल खड्डा पडला आहे. सुदैवाने त्यावेळी तिथून कोणतीही गाडी जात नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अटल सेतूकडे जाणाऱ्या शिवडी BPT रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या खड्ड्याभोवती पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. तसेच सध्या हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आङे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. असे असताना अचानक हा रस्ता कसा खचला याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.