T20 world cup स्वत:चं डोकं लावता येत नाही का! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे शाहीद आफ्रिदी जावयावर भडकला

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी त्याच्या जावयावर जाम भडकला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्याने त्याला जाम शिव्या दिल्या जात आहे. मात्र शाहीद आफ्रिदीने हसन अलीप्रमाणे त्याच्या जावयालाही या पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. उपांत्य फेरीतील सामन्याच्या 19 व्या षटकात शाहीनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेडचा कॅच हसन अली याने सोडला होता. यानंतर वेड याने 3 षटकार खेचत सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला होता.

Matthew Wade – जेव्हा ‘वेड’ शहाणा निघाला!

पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना शाहीद आफ्रिदीने म्हटले की ‘हसन अली याने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर उडालेला कॅच सोडला खरा मात्र त्यानंतर शाहीन आफ्रिदी याने नीट गोलंदाजी करायला हवी होती. कॅच सोडला याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही वाईट बॉल टाकाल आणि लागोपाठ 3 षटकार खाल.’ शाहीद आफ्रिदी पुढे म्हणाला की कॅच सुटल्यानंतर शाहीन याने डोकं लावायला हवं होतं. त्याच्याकडे असलेल्या वेगाचा वापर करून त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकायला हवा होता. शाहीन आफ्रिदी या सामन्यातून नक्की शिकला असेल अशी आशा शाहीद याने व्यक्त केली आहे.

टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा फ्लॉप शो; जाहिरातदारांचा ‘गेम’ फसला

शाहीद आफ्रिदीची मुलगी अक्सा हिचं शाहीनशी लग्न होणार आहे. शाहीद आफ्रिदीचं लग्न नादियाशी झालं होतं, आणि या दोघांना 5 मुली आहेत. अक्सा ही सर्वात मोठी मुलगी असून तिचा आणि शाहीन यांचा साखरपुडाही झाला आहे. लवकरच या दोघांचे लग्नही होणार आहे.