न्यूझीलंडला अंतिम लढतीपूर्वी धक्का, कॉनवेने रागात हात फ्रॅक्चर करून घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षणिक राग माणसाचे किती नुकसान करू शकतो याचा प्रत्यय चक्क यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आलाय. रविवारी लढाऊ न्यूझीलंड आपल्या पहिल्या टी-20 विश्वविजेतेपदासाठी बलाढय़ ऑस्ट्रेलियाला टक्कर देणार आहे, पण या लढतीआधीच एका घटनेने न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. तुफान फॉर्मात असणारा किवीजचा यष्टिरक्षक-फलंदाज डेवोन कॉनवे याने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत बाद झाल्यावर स्वतःवर राग काढत डावा हात संतापाने बॅटवर जोराने आपटला. या प्रकारात कॉनवेच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून तो या विश्वचषकाच्या अंतिम लढतीतून बाहेर झाला आहे. याशिवाय हिंदुस्थानविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेतही का@नवेला आता खेळता येणार नाही.

यंदाच्या टी-20 विश्वचषकात तुफान फलंदाजी करीत संघाला बाद फेरीत पोचवणाऱया का@नवेची मोठी उणीव न्यूझीलंड संघाला विश्वचषक अंतिम लढतीत जाणवणार आहे. क्षणिक रागाने का@नवेची अंतिम लढत खेळण्याची सुवर्णसंधी हुकणार आहे. शिवाय न्यूझीलंड संघालाही एक फॉर्मात असलेला फलंदाज नाहक गमवावा लागला आहे.