
मनोरंजन क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मंगळावारी वितरण करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. विजेत्यांची घोषणा 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.
यंदा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांना 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाहरुख खानला ‘जवान’ या चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटातील शाहरुख खानच्या दुहेरी भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. राणी आणि शाहरुखव्यतिरिक्त अभिनेता विक्रांत मेस्सीला याला ’12वीं फेल’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहनलाल गेल्या 40 वर्षांपासून मल्याळम, तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करत आहेत. त्यांनी 400 हून चित्रपटात काम केले आहे.