
वेस्ट इंडीज दिग्गज खेळाडूंना टी-20 पेक्षा कोणतेही फॉरमॅट आवडत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. मात्र गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात 7 विकेट घेत वेस्ट इंडीजला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱया 24 वर्षीय शमार जोसेफने आपल्याला आपल्या देशासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असल्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच आपल्याला जगभरातील टी-20 लीगमध्ये खूप खेळायचे आहे, पण सोबतीला आपली फिटनेससुद्धा राखाचयी आहे.
गयानातील एका छोटय़ाशा गावात सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असलेल्या शमारला मार्क वूडच्या अनुपस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या संघात स्थान दिले आहे. पुढील काळातील माझ्या फिटनेसनंतरच स्पष्ट होईल की मी किती क्रिकेट खेळू शकतो. मला माझ्या फिटनेसवर पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वतःला क्रिकेटसाठी जास्तीत जास्त फिट ठेवू शकतो, असेही तो म्हणाला.



























































