हिंदुस्थान आणि चीन सीमेवर आहे एक रहस्यमय़ीन खोरे

12235

 

बरमुडा ट्रायंगल ही जगातील अशी जागा आहे जिचं रहस्य हे जगभरासाठी आजही एक न सुटलेलं कोडं आहे. या ट्रायंगलमध्ये अनेक बोटी, विमानं बुडाल्याचे बोलले जाते. काही वर्षांपूर्वी मलेशियाचे एक विमान देखील 227 प्रवाशांना घेऊन गायब झाले होते हे विमान देखील बरमुडा ट्रायंगलमध्ये बुडाल्याचे बोलले गेले होते. अशा या रहस्यमयी बरमुडा ट्रायंगलसारखीच एक जागा हिंदुस्थान जवळ देखील आहे. या ठिकाणी जाणारी व्यक्ती पुन्हा कधीच परत आलेली नाही. अनेक शास्त्रज्ञांनी शांग्रीला खोऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही त्यातले काही कायमचे गायबही झाले.shangrila

हिंदुस्थान आणि चीन सीमेवर हे रहस्यमय़ीन खोरे असून त्याला शांग्रीला खोऱ्याच्या नावाने ओळखले जाते. हे खोरे तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या मध्यावर आहे. या खोऱ्याच्या बाबतीत वेगवेगळे दावे केले जातात. या खोऱ्यात जाणारी व्यक्ती परत आलेली नाही असे बोलले जाते. त्यामुळे या खोऱ्याच्या बाबतीत देखील बरमुडा ट्रायंगलसारखेच रहस्यमयी दावे केले जातात. त्यामुळे ही जागा अत्यंत भयंकर असल्याचे बोलले जाते. प्रख्यात तंत्र साहित्य लेखक आणि विद्वान अरुण कुमार शर्मा यांनीही आपल्या ‘द मिस्टीरियस व्हॅली ऑफ तिबेट’ या पुस्तकात या खोऱ्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की शांग्रीला खोऱ्याला भेट देणाऱ्या व्यक्तीचे अस्तित्व या जगापासून नाहीसे होते. पद्म विभूषण आणि साहित्यातील प्रख्यात डॉ. गोपीनाथ कविराज यांनी देखील त्यांच्या पुस्तकात या खोऱ्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी याबाबत सांगताना या खोऱ्याचा संबंध परलोकाशी केला आहे.

shangrila-2

तिबेटमधील तवांग मठ या संग्राहलयात ‘काल विज्ञान’ हा प्राचीन कालीन ग्रंथ असून त्यात या खोऱ्याबाबत एक अजब दावा केला आहे. या पुस्तकानुसार आपली हजार वर्ष म्हणजे या खोऱ्यातील अवघा एक सेकंद. शांग्रीला घाटीला सिद्धाश्रम देखील म्हणतात. महाभारत, वाल्मिकी रामायण आणि वेदांतातही सिद्धाश्रमचे वर्णन केले आहे. ब्रिटीश लेखक जेम्स हिल्टन यांनी आपल्या लॉस्ट होरायझन या पुस्तकात सिद्धाश्रमाचा उल्लेख केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या