
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱया मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विजयी झाले. शरद पवार यांच्या विरोधात धनंजय शिंदे यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीत 34 जणांपैकी 31 जणांनी मतदान केले. शरद पवार यांना 29 तर धनंजय शिंदे यांना 2 मते मिळाली.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीआधी रंगलेल्या आरोप – प्रत्यारोपामुळे ही निवडणूक चर्चेत होती. निवडणुकीत शरद पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार गेली 40 वर्षे ग्रंथालयाशी जोडलेले आहेत. ते 1994 पासून ते अध्यक्ष आहेत, तर त्याआधी उपाध्यक्ष होते.
z उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. तीही निवडणूक एकतर्फीच झाली. माजी आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर, शशी प्रभू निवडून आले. किरण सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
कार्यकारिणी बिनविरोध
15 कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली. या कार्यकारिणी सदस्यांमधून 8 पदाधिकाऱयांची निवड येत्या 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जयवंत गोलतकर, सुरेंद्र करंबे, उदय सावंत, रवींद्र गावडे, सुनील राणे, विनायक परब, प्रदीप ओगले, हेमंत जोशी, मनीष मेस्त्राr, शीतल करदेकर, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, सूर्यकांत गायकवाड, शिल्पा पितळे, स्वप्नील लाखवडे हे कार्यकारिणी सदस्य निवडून आले आहेत.
































































