शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यानंतर शरद पवार यांचीही रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही चाचणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

खबरदारी म्हणून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातील संपूर्ण स्टाफची तसेच सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी-अधिकाऱयांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात 6 सुरक्षा कर्मचारी वगळता अन्य सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. शरद पवार यांच्या सुरक्षेतील सहाजणांना कोरोना संसर्ग झाल्याने तातडीने पावले उचलण्यात आली. पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील चार दिवस पुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आवश्यक असलेली सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे टोपे यांनी नमूद केले.