…आणि शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कराड

सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कराडमधील सभेत भाषणानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंची कॉलर उडवली आहे. या गमतीदार प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची पद्धत ही सर्वांनाच माहीत आहे. यावेळी मात्र चित्रं काहीसं वेगळं होतं. उदयन राजेंनी जोशात भाषण केलं आणि भाषणाच्या समारोपावेळी ”एकच सांगतो, मी कधी कुणावर अन्याय केला नाही आणि अन्याय सहनही केला नाही. एक बार जो मैंने कमिटमेंट की तो मैं खुद की भी नहीं सुनता..” असे म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवली व स्टाईल ईज स्टाईल’असा डायलॉग मारला. भाषण संपवून उदयनराजे पवारांशेजारी जाऊन बसल्यानंतर पवारांनी उदयनराजेंची कॉलर स्वत:च्या हाताने पुन्हा उडवली. पवार इतक्यावरच न थांबता त्यांनी बुक्कीने उदयनराजेंच्या खांद्यावर शाबासकीही मारली.

दरम्यान, याआधी 2018 मध्ये शरद पवार यांनी साताऱ्यात मिश्कीलपणे स्वतःची कॉलर उडवली होती. सातारा जिल्ह्यात खासदार व आमदार यांच्यात कोणताही पेच नाही. मी असल्यावर सर्व काही ठीक होते. माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात असा चिमटा उदयराजे यांना काढत पवार यांनी मिश्किलपणे कॉलर उडवून दाखवली होती.