हे शहाणपणाचे लक्षण नाही! मोदींच्या मुंबईतील रोड शोवर शरद पवारांची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील घाटकोपर येथे रोड शो घेतला. या रोड शो साठी मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली, अनेक रस्ते बंद करण्यात आले, वाहतूक वळवण्यात आली. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्ष नसल्याची टीका पंतप्रधान मोदींवर केली.

नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील रोड शो वर भाष्य केले. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो करणे शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासंतास थांबावे लागले, ट्राफिकची समस्या झाली. मुख्य म्हणजे मोदींनी हा रोड शो घेतला तो पूर्णपणे गुजराती भाग आहे. त्यांचे लक्ष फक्त एका वर्गाकडे होते, मात्र यामुळे लोकांना खुप त्रास सहन करावा लागला, असे शरद पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा विचार करतील या विधानावरही शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी शिवसेनेबद्दल बोललेलो नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. शिवसेनेचे 58, राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 आणि काँग्रेसचे 44-45 आमदार निवडून आलेले. शिवसेना हा छोटा पक्ष नाही.

हे वाचा – राज्याचे उपमुख्यमंत्री गायब? मोदींच्या कार्यक्रमात अजित पवार दिसलेच नाहीत

नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना या मोदींच्या टीकेलाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींकडे बोलायला कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे वारंवार हे बोलतात. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसैनिक कोणाबरोबर आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात कुठे गेलात, मग भलेही त्यांचा पक्ष फुटला असला, शिदेंनी वेगळा मार्ग निवडला असला तरी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असेही शरद पवार म्हणाले.

तेव्हा मोदी मला गुजरातला घेऊन जायचे, पण आता…; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

राज ठाकरेंना टोला

शरद पवारांनी अनेक पक्ष फोडले या राज ठाकरे यांच्या विधानाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. नाशिक हा त्यांचा स्ट्राँग बेस आहे असे ऐकले होते, पण ते हल्ली नाशिकमध्येही दिसत नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)