मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसने राफेल करारावरून नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले असताना त्यांचे पूर्वीचे साथीदार शरद पवार यांनी वेगळीच भुमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्या हेतुबद्दल जनतेच्या मनात शंका नसल्याचेही त्यांनी सांगितले एका मुलाखातीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतुबद्दल जनतेच्या मनात कुठलीच शंका नाही, तसेच विरोधी पक्षांनी राफेल या लढाऊ विमानाच्या तंत्रज्ञानाच्या माहितीची केलेली मागणी निरर्थक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, “राफेल विमानाच्या किंमतीबाबत खुलासा करण्यात काहीच अडचण नाही कारण ही तांत्रिक बाब आहे.”. तसेच राफेल विमान हे देशाच्या सुरक्षेसाठी खूप उपयोगी असल्याचेही ते म्हटले. मंगळवारी पुण्यात पवार म्हणाले होते, की “काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष राफेलच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, माझ्या मते सरकारला या बाबत माहिती देण्यात कुठलीच अडचण नसली पाहिजे. मी सुद्धा संरक्षण मंत्री होतो, करारात शस्त्रांच्या क्षमतेबद्दल गोपनीयता असते, किंमत ही तांत्रिक बाब असते.”