अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मराठवाड्याचा शरद पवार करणार दौरा; नुकसानीचा घेणार आढावा

sharad-pawar-new

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्याचा फटका हातातोंडाशी आलेल्या पिकांना बसला आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार आणि सोमवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा दोन दिवसांचा असेल. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, धाराशीव येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देत नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या मराठवाड्याला भेट देत शरद पवार नुकसानीची पाहणी करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या