
शेअर बाजाराचा सेन्सेक्स 4 महिन्यांनंतर 80 हजारांच्या खाली आला. आज कामकाज सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 765 अंकांनी घसरून तो 79,857 वर बंद झाला. तब्बल चार महिन्यांनंतर सेन्सेक्स इतका खाली आला. 9 मे रोजी सेन्सेक्स 79,454 वर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 246 अंकांनी घसरला आणि 24,350 वर बंद झाला. सेन्सेक्सचे 30 पैकी 5 समभाग वधारले आणि 25 समभाग घसरले. धातू, आयटी, ऑटो आणि रिअॅल्टी क्षेत्रातील समभाग सर्वाधिक घसरले. आशियाई शेअर बाजारात जपानचा निक्केई 762 अंकानी वाढून तो 41,820 वर पोहोचला, तर कोरियाचा कोस्पी 17 अंकांनी घसरून 3,210 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 222 अंकांनी घसरून 24,858 वर बंद झाला, तर चीनचा शांघाय पंपोझिट 73 अंकानी वाढून 21,242 वर बंग झाला.
टॅरिफ आणि व्यापार करारावरील अनिश्चितता
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेले 50 टक्के टॅरिफ आणि व्यापार कराराव असलेली अनिश्चितता यांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर शेअर्सची विक्री होऊन शेअर बाजार कोसळला. भारती एअरटेलचा शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी घसरला. तसेच इन्पहसिस, ऑक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक हे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरले.