शेअर बाजार 800 अंकांनी वधारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

आर्थिक मंदीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवडय़ात घोषणा केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारात झाला. सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी वधारला. गुंतवणूकदारांसाठी गेल्या तीन महिन्यांनंतर शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. ‘निफ्टी’चा सेन्सेक्स 228 अंकांनी वधारला. बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी 11,057 अंकावर होता. बाजार उघडताच सेन्सेक्स 662 अंकांनी वधारला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 792.96 अंकांनी वधारून 37494 अंकावर स्थिर झाला.

अर्थमंत्री सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 70 हजार कोटी देण्याची घोषणा केली. तसेच चलनवाढीसाठीही उपाययोजना करण्याचे जाहीर केले. यामुळे आज शेअर बाजारात बँकांचे शेअर 5.24 टक्क्यांनी वधारले. यामध्ये येस बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय, स्टेट बँक, ऍक्सिस, कोटक बँकेचे शेअर्स वधारले, मात्र टाटा मोटर्स, हीरो मोटो कॉर्प, मारुती सुझुकी, बजाज ऍटो, टाटा स्टील, सन फार्मा, वेदांता, आरआयएलचे शेअर्स 2.01 टक्क्यांनी कोसळले.