
आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. दिवसाच्या सुरवातीलाच निर्देशांकात 1000 अंकांची घसरण नोंदवली. निफ्टीही 17,000 च्या खाली घसरला. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर आशियाई बाजारात गेल्या 14 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी 9:26 वाजता उघडल्यानंतर BSE निर्देशांक 1,011 अंकांनी म्हणजेच 1.75 टक्क्यांनी घसरून 56,847 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी या कालावधीत 180 अंकांनी म्हणजेच 1.62 टक्याने घसरून 16,998 च्या पातळीवर आला.
निफ्टीमध्ये टेक महिंद्रा, नेस्ले, विप्रो या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले, तर केवळ ओएनजीसीचे शेअर्स चांगली कमाई करत आहेत. बीएसई निर्देशांकावरही हीच स्थिती होती. 30 समभागांवर आधारित निर्देशांकावर, NTPC वगळता, इतर सर्व 29 समभाग तोट्यात आहेत. सर्वात मोठी घसरण विप्रो, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये झाली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी बाजार बंद होता. याआधी मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली, परंतु बंद होताना, गेल्या पाच सत्रांपासून त्याची सतत होणारी घसरण थांबली होती. बीएसई सेन्सेक्स 367 अंकांची उसळी घेत बंद झाला होता. त्याच वेळी, निफ्टी 128.85 अंकांच्या म्हणजेच 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 17,277.95 वर बंद झाला.






























































