शेअर बाजाराची घसरण सुरुच; सेन्सेक्स 36,700 च्या खाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेरिका चीनमधील व्यापारयुद्ध आणि अमेरिकेच्या काही निर्णयांमुळे जागतिक बाजारात मंदीचे सावट आहे. त्याचा परिणाम देशातील शेअर मार्केटवरही झाला आहे. आठवड्यातील आजच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बाजार सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच बाजारात 300 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. बाजाराचा निर्देशांक 36,670 पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीत 105 अंकाची घसरण होऊन तो 10,874 पर्यंत खाली आला होता.

बाजाराच्या सुरुवातीला वेंदाता, हिरो मोटो, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, बजाज अॅटो, बजाज फायनान्स, येस बँक,आयसीआयसीआ बँक या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. तर एअरटेल, इन्फोसिस, एशियन पेंट, टीसीएस या शेअरमध्ये तेजी होती. गुरुवारीही शेअर बाजारात घसरण सुरू होती. 463 अंकांच्या घसरणीनंतर गुरुवारी 37,018 वर बाजार बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये 105 अंकाची घसरण होऊन तो 10,980 वर बंद झाला होता. तर शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण होऊन बाजाराचा निर्देशांक 36,670 पर्यंत खाली आला आहे.