
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावर टीका करत तो केवळ सावध आर्थिक धोरणावर आधारित असल्याचे म्हटले आहे. मात्र, दृष्टी आणि न्याय्यतेचा अभाव असल्यामुळे हा अर्थसंकल्प अपुरा ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
थरूर म्हणाले की, या अर्थसंकल्पात बेरोजगारी, वाढती महागाई आणि आर्थिक विषमता या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षांना उत्तर देणाऱ्या उपाययोजना यात दिसत नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
सरकार सातत्याने कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत असले तरी प्रत्यक्ष खर्चाकडे पाहिले तर वेगळीच स्थिती दिसते, असेही थरूर म्हणाले. मोठ्या घोषणांच्या आड दीर्घकाळापासून निधीचा अपुरा वापर आणि प्रशासकीय अपयश दडलेले असल्याचा आरोप त्यांनी केला. “ही कारभाराची पद्धत नसून केवळ हेडलाईन मिळवण्याचा प्रयत्न आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
“This budget is praised for its prudence, but prudence without vision or fairness is hollow.
It ignores unemployment, rising living costs, and inequality, offering little to address the real struggles and aspirations of the common man.
The government speaks endlessly of… pic.twitter.com/TrwUvG9jLR
— Congress (@INCIndia) February 10, 2026


























































