
काँग्रेस कार्यसमितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोवर कडाडून टीका केली आहे. हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण असल्याची प्रतिक्रिया शशी थरूर यांनी नोंदवली आहे.
तिरुवअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली की, ते मोईत्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित होते. त्यात माझ्या बहिणीसह 15 जण सहभागी झाले होते. या दरम्यान जो फोटो काढण्यात आला होता, तो चुकीच्या पद्धतीने क्रॉप करून थरूर आणि मोईत्रा यांना बदनाम करण्यात येत आहे. हे एक गलिच्छ, हीन दर्जाचं राजकारण आहे. ती त्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी होती. महुआ या वयाने माझ्याहून 20 वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे त्या मला मुलीसारख्या आहेत, असंही थरूर यावेळी म्हणाले.
अशा ट्रोल्सना आपण महत्त्व देत नाही आणि लोकांसाठी काम करण्यात व्यग्र असल्याचं मतही थरूर यांनी व्यक्त केलं. लोक या फोटोला चुकीच्या अर्थाने व्हायरल करत आहेत. पण, जर ही एक खासगी भेट होती तर हा फोटो कुणी काढला, याचा विचार ते करत नाहीत, असा टोलाही थरूर यांनी यावेळी हाणला.


























































