शेगावमधील गजानन महाराजांचे मंदिर 14 एप्रिलनंतर पूर्ववत सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्याने आता राज्यातील सर्व मंदिरे पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहेत. मात्र शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर हे 14 एप्रिलनंतरच पूर्ववत सुरू होणार असल्याचे मंदिर प्रशासन समितीने स्पष्ट केले आहे.

गजानन महाराज मंदिरात कोरोना काळात ऑनलाईन बुकिंग करून दर्शन देण्यात येत होते. त्यामुळे 10 एप्रिलपर्यंत या मंदिराचे ऑनलाईन बुकिंग फुल आहे. त्यामुळे या काळात ई पासद्वारेच दर्शन सुरू राहणार आहे. त्यानंतर 11 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत मंदिर बंद राहणार असून 14 एप्रिलपासून पूर्ववत दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

रामनवमी उत्सव मर्यादित स्वरुपात

रामनवमी ही यंदा 10 एप्रिलला आहे. त्यामुळे हा उत्सव मर्यादित स्वरुपातच करण्याचा निर्णय प्रशासन समितीने जाहीर केला आहे.