शेगाव नवोदय विद्यालयातील विद्यार्थी हिमाचल प्रदेशमध्ये अडकले

1730

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील 12 मुली व 9 मुले असे एकूण एकवीस विद्यार्थी हिमाचल प्रदेशमध्ये अडकून पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बुलढाणा ते परतण्याची व्यवस्थाच नसल्याने पालक वर्ग हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शेगाव येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतात. नवोदय विद्यालयाच्या प्रचलित नियमानुसार इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना वरषभरासाठी ईतर राज्यांमध्ये पाठविले जाते. त्यानुसार शेगाव येथील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशमधील चंबा या ठिकाणी असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात पाठविण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांचा शालेय अभ्यासक्रम आटोपून हे विद्यार्थी परत येण्याच्या मार्गावर होते, मात्र याच काळात सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने या मुलांच्या परतण्याचा मार्ग बंद झाला. विद्यालयातील इतर सर्व मुले निघून गेल्यामुळे केवळ हे एकवीस विद्यार्थी त्याठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये हुरहूर निर्माण झाली आहे.

आमच्या मुलांना परत बोलवा परत आणण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री संजय धोत्रे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी पालकांनी केली आहे. परंतु आजवर या विद्यार्थ्यांना परत आणण्याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही आमची मुले रडतात व्यवस्थित जेवण करत नाहीत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी पोहोचविण्याची व्यवस्था केंद्र शासनाने करावी, अशी या पालकांची मागणी आहे.

पालकांनी चिंता करु नये
या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र लॉकडाऊन झाल्याने सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे ते तेथेच आहेत. त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पालकांनी चिंता करू नये. प्रशासकीय पातळीवर आम्ही प्रयत्न करीत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या