
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर 19 फ्रेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. या लव्ह बर्डचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फरहान अख्तर यानेही आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी खूपच क्यूट दिसत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वी शिबानी दांडेकर आणि मी आमच्या खास क्षणांना सेलिब्रेट केले. आमच्या प्रायव्हसीची काळजी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार, असे फरहानने म्हटले.

तसेच हे सेलिब्रेशन तोपर्यंत अपूर्ण आहे जोपर्यंत या क्षणांचे काही अननोल फोटो आपल्यासोबत शेअर करत नाही. आम्ही नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत, त्यामुळे आम्हाला आशिर्वाद द्या, असेही फरहानने म्हटले.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये शिबानी दांडेकर हिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये ती आपले सासरे जावेद अख्तर यांच्यासोबत गाण्यावर ठेका धरत असल्याचे दिसते.

शिबानीसोबतच्या लग्नामध्ये फरहान अख्तर याच्या दोन्ही मुली देखील वऱ्हाडी बनून सहभागी झाल्या होत्या.

शिबानी आणि फरहान यांनी हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने विवाह केला नाही तर ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

फोटोमध्ये फरहान शिबानीला रिंग घालताना आणि तिचे चुंबन घेताना दिसत आहे.

आपल्या आयुष्यातील या खास क्षणांसाठी शिबानीने लेव्हेंडर कलरचा स्ट्रेपलेस गाऊन घातला होता. सोबत काही दागिनेही घातले होते.

नवदांपत्याला शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी ऋतिक रोशन, रिया चक्रवर्ती, फराह खान, प्रोड्यूसर रितेश सिधवानी, डायरेक्टर आशुतोष गवारिकर, साकिब सलीमसह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.



























































