मतदारसंघातील विकासकामे होत नसल्याने शिंदे गटातील आमदार नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेसोबत गद्दारी करून शिंदे गटासोबत गेलेले आमदार दिलीप लांडे हे त्यांच्या मतदारसंघात काम होत नसल्याने नाराज असल्याचे समजते. मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

सरकार बदलले आहे पण यंत्रणा सुधारलेली नाही. मतदारसंघातील कामं होत नाहीत. संबंधित मंत्र्यांना खोटं सांगितलं जातं पण प्रशासनातले अधिकारी काम करत नाही. उदाहरणार्थ जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की शासनाच्या जागेवर नामफलक लावा की सरकारची जागा आहे. पण दोन वर्ष झालं तरी ती होत नाही. अशा पद्धतीच्या सूचना देऊनही काम होत नसतील तर अशा बैठकीला बैठकीला येऊन काय उपयोग. आमदाराने फक्त काय नाश्ता करायला यायचं का? नाश्ता द्यायचा आणि आमदाराचे तोंड बंद करायचे, असं काम मला जमणार नाही’, अशा शब्दात दिलीप लांडे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.