
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. पुण्याच्या नारायणगाव येथील रहिवासी साईभक्त श्रीमती साधना सुनिल कसबे यांनी मंगळवार 30 सप्टेंबर2025 रोजी श्री साईचरणी 123.440 ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्याचे कडे अर्पण केले. याची किंमत 13 लाख 12 हजार 538 रुपये आहे.
हे सुंदर नक्षिकाम असलेले कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.