
शिर्डी – रामनवमी उत्सवानिमित्त साईनगर मैदानात साईबाबांची प्रतिमा रांगोळी द्वारे साकारण्यात आली आहे. ४० हजार स्केअर फुट असलेली हि रांगोळी महत्वाचे आकर्षण ठरणार आहे. मुंबई येथील ३५ कलाकार तसेच ग्रामस्थांच्या अथक मेहनतीतून हि भव्य दिव्य रांगोळी साकारली गेली आहे.ड्रोन कँमे-यातुन टिपलेले रांगोळीचे छायाचित्र. साईबाबांची आजवरची हि सर्वात मोठी रांगोळी विश्वविक्रमी ठरणार आहे.




























































