
मावळत्या वर्षाला अलविदा करण्यासह साईबाबांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविकांनी शिर्डीत गर्दी केली होती. या भाविकांनी साईचरणी भरूभरून दान दिले आहे. या 11 दिवसांत 17 कोटी 42 लाख रुपयांची देणगी मिळाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही देणगी तीन कोटींनी अधिक आहे. 1213 ग्रॅम सोने, 17 किलो चांदी व परकीय चलनाचा यात समावेश आहे.

























































