
महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्य़ारी यांचा राजीनामा अखेर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. ‘राज्यपालांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचा विजय’ असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या, घटनाबाह्य सरकार बसवणाऱ्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांना अखेर जावंच लागलं!
हा महाराष्ट्राचा विजय आहे, इथल्या लोकभावनेचा विजय आहे, महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचा विजय आहे!
गर्जा महाराष्ट्र माझा!— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 12, 2023
”महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या, घटनाबाह्य सरकार बसवणाऱ्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांना अखेर जावंच लागलं! हा महाराष्ट्राचा विजय आहे, इथल्या लोकभावनेचा विजय आहे, महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचा विजय आहे! गर्जा महाराष्ट्र माझा!” अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा व महापुरुषांचा अवमान करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड रोष आहे. त्यानंतर राज्यपालांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर आज त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या नव्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






























































