शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुलुंड विधानसभा व ग्राहक संरक्षण कक्ष यांच्या वतीने प्रकाश सावंत, पुरुषोत्तम दळवी यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मुलुंड पश्चिम येथील मराठी विद्यालय सभागृह येथे हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते दत्ता दळवी, खासदार संजय दिना पाटील, विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी, ग्राहक संरक्षण कक्षचे विधानसभा संघटक प्रकाश सावंत या मेळाव्याचे आयोजक आहेत. उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, नितीन चवरे, विधानसभा संघटक नंदिनी सावंत, उपविभाग संघटक सुनीता धोंगडे, हेमलता सुकाळे, कविता शिर्के, विधानसभा संघटक संजय माळी, व्यंकटेश अय्यर, शकुंतला कदम, पुष्पा अनपट, संगीता देठे, प्राप्ती वाघ, रूपाली सुभेदार, यशोदा चंदनशिवे या मेळाव्याच्या निमंत्रक आहेत.