शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसेनेची वचनपूर्ती, रूईकर कुटुंबियाच्या निवासस्थानाचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड येथील निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियाच्या निवासस्थानाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली होती. आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने वचनपूर्ती केली. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये निवासस्थानाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी बीडहून बालाजी पायी यात्रा सुरू असताना निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रूईकर यांचे कर्नाटकमध्ये पोहचल्यावर प्रवासातच दु:खद निधन झाले. सुमंत रूईकर यांच्या निधनाने संपूर्ण शिवसेनेने हळहळ व्यक्त केली. हळहळल्या शिवसैनिकांनी सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियांना आधार दिला. त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली. तातडीने पाच लाख रूपयाची मदतही पाठवून दिली. लवकरच घराचा प्रश्न पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी दिला. आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून दिलेला शब्द पूर्ण केला.

बीड शहरातील धोंडीपुरा भागात सराफा लाईन परिसरात सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी घराचे भूमिपुजन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये पार पडले. याप्रसंगी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कायम सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियाच्या पाठिशी खंबीर उभी राहिल. कोणतीही अडचण आली तरी माझ्याशी संपर्क साधा, आम्ही कायम तुमच्या पाठिशी आहोत. शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी तुमच्या पाठिशी आहे. लवकरच घराचे बांधकाम पूर्ण होईल असा शब्द दिला.

या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, महिला जिल्हा संघटक संगिता चव्हाण, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, जिल्हासंघटक नितीन धांडे, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, युवा जिल्हाधिकारी सागर बहीर, पप्पू बरिदे, नगरसेवक शुभम धूत, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून बाजीराव चव्हाण, किशोर जगताप, सुनील अनभुले, शुभम डाके, कृष्णा वांगीकर, अक्षय काशीद, आकाश जगताप आदी उपस्थित होते.

शिवसेनेमुळे बळ मिळाले

माझ्या पतीचा पायी प्रवासात मृत्यू झाल्यानंतर आम्ही अक्षरश: उघडे पडतो की काय अशी भीती मला सतावत होती. मात्र दुसऱ्या क्षणापासून शिवसेनेने खंबीर साथ दिली. शिवसेनेमुळे बळ मिळाले. माझ्या कुटुंबाला मोठी मदत शिवसेनेने दिली. आज स्वप्नातल्या घराचे भूमिपूजन प्रत्यक्ष होत आहे. शिंदे साहेब गृहप्रवेशाला आपण स्वत: यावे असे निमंत्रण देत गहिवरलेल्य सुमंत रूईकर यांच्या पत्नी किर्ती रूईकर बोलत होत्या.