370 कलम हटवले; मुंबईत जल्लोष सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
happy-shiv-sena

सामना प्रतिनिधी । मुंबई

मोदी सरकारने जम्मू कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. मुंबईत ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ‘भारत माता की जय, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचा विजय असो अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला.

शिवसेना शाखा क्र. 58 च्या वतीने मिरवणूक काढली. या वेळी विधानसभा संघटक दिलीप शिंदे, उपशाखाप्रमुख बाळा सोनावणे, विनोद माने, संजय भालेराव, सतीश वागळे, दयानंद शिंदे, संजय फणसे, रेमंड डिसुझा, अस्लम खुरेशी, गंगाराम वैती, शाखाप्रमुख चंद्रकांत मोरे, ललेश भगत, जितेंद्र इंगळे, दादासाहेब पवार, समीर राजपूरकर, दिलीप सावंत, अविनाश किर उपस्थित होते.

शिवसेना वॉर्ड क्रमांक 49 च्या वतीने संगीता सुतार आणि समाजसेवक संजय सुतार यांच्या वतीने पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी मालाड विभाग संघटक अनिल भोपी, मच्छीमार नेते किरण कोळी, समाजसेवक बाबू सुतार, शाखाप्रमुख संदेश घरत, युवासैनिक आदी उपस्थित होते.

विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली करीरोड नाका येथे जल्लोष करण्यात आला. आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी आमदार दगडू सकपाळ तसेच सचिन अहिर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख गोपाळ खाडये यांनी केले.

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली नरीमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयाबाहेर मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार तमीळ सेल्वन, भाई गिरकर, राज पुरोहित, अतुल शहा, शायना एन. सी., भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.