बेस्टच्या वसाहती खासगी कंपन्यांना भाड्याने देऊ नका, शिवसेनेची जोरदार मागणी

बेस्ट उपक्रमाच्या पंबाला हिल आणि पुलाब्याची कर्मचारी वसाहती कोणत्याही खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात येऊ नये अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आज केली.

बेस्ट उपक्रमाच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुहास सामंत बोलत होते. बेस्ट बंद करण्याचे सध्या प्रयत्न सुरू  आहेत. पण  बेस्टला दहा हजार कोटींची सरकारने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

अदानींच्या स्मार्ट मीटरला विरोध

अदानींच्या स्मार्ट मीटरला लोकांचा विरोध आहे. विजेसाठी स्मार्ट मीटरची सक्ती करणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, पण तरीही हे मीटर लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक पूर्णवेळ गरजेचा

बेस्टचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपक्रमाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पूर्णवेळ महाव्यवस्थापकाची गरज त्यांनी व्यक्त केली.