जनआशीर्वाद यात्रा, हीच तीर्थयात्रा… आदित्य ठाकरेंनी घेतलं अवतार मेहेर बाबांचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-rally-nagar1

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेना नेते व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज नगर येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. अवतार मेहेर बाबा ट्रस्ट रमेश जंगले यांनी आदित्य ठाकरे यांचे यावेळी स्वागत केले. अवतार मेहेर बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदित्य ठाकरे यांनी या परिसराची पाहणी सुद्धा केली. अवतार मेहेरबाबा यांचे ज्या ठिकाणी समाधी स्थान आहे तेथे त्यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

यावेळी मंत्री रामदास कदम, मंत्री बापू शिवतारे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड नगरचे संपर्क होऊ भाऊ कोरगावकर, वरुण सरदेसाई, युवा सेनेचे संपर्कप्रमुख रुपेश पाटील युवा सेनेचे नगर जिल्हा अधिकारी विक्रम राठोड जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.