
त्या साडेतीन लोकांची नावं जाहीर केली तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल तसतसं तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्य़ा गप्पा करतात ते सगळे तुरुंगात जाणारच, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानविरुद्ध जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जातोय हे लवकरच उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे आणि त्यांना मदत करणारे अधिकारी सगळे तुरुंगात जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीसही तपास करण्यासाठी सक्षम आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मी या सगळय़ा गोष्टींचा खुलासा करेन. तपास यंत्रणांच्या अधिकाऱयांकडून अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे घडले असल्याचे नमूद करत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा पुनरुच्चारही शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी गैरव्यवहार केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी त्यांची इतकी पळापळ का सुरू आहे? कोणत्या गुन्ह्याखाली त्यांना अटक होणार याची स्पष्टताच नाही मग अटकपूर्क जामिनासाठी ते धाकाधाक का करत आहेत? तुम्हाला पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात अटक होण्याची भीती काटते का हे स्पष्ट करा, असेही न्यायालयाने सोमय्या यांना सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले.
साडेतीन नाकं मोजत राहा
पीएमसी घोटाळा, खंडणी यांसारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सगळय़ांना समजेल. मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावेळेपासून हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाकाधाक करत आहेत. त्यामुळे मी जे साडेतीन म्हणालो ते तुम्ही मोजत रहा, असा टोला संजय राऊत यांनी सोमय्या यांना लगावला.
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आधीच का आणलं नाही
युक्रेनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत आणण्याकरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. हिंदुस्थान सरकार सक्षम आहे, पण तेथील विद्यार्थ्यांना आधीच का आणलं नाही? केंद्रातील सरकारला निवडणुकीमुळे उशिरा जाग आली. युक्रेन क पोलंडच्या सीमेकर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, उपाशी ठेकले. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही राजकारण करता असा संतप्त सवाल करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला कर्तव्याची आठवण करून दिली.





























































