
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त कुरारमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र रहिवाशांना आदेशपत्र आणि ओळखपत्राचे वाटप दिंडोशी विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा 36 व 37 च्यावतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येते. या योजनेतंर्गत 65 वर्षांखालील विविध कारणांमुळे निराधार पुरुष व महिलांना लाभ मिळतो. मात्र, त्यासाठी रहिवाशांना संजय गांधी पेन्शनचे आदेशपत्र आणि ओळखपत्र आवश्यक असते. मात्र, त्यासाठी रहिवाशांना सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. यातून वेळ तर जातोच शिवाय पैसेही खर्च होतात. मात्र, शिवसेनेच्या वतीने योजनेसाठी आवश्यक असलेले आदेशपत्र आणि ओळखपत्र वर्धापन दिनानिमित्त देण्यात आली.
यावेळी तहसीलदार इरेश चप्पलवार, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, विधानसभा संघटक रीना सुर्वे, विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, सुनील गुजर, भाई परब, उपविभाग समन्वय रुचिता आरोसकर, वृंदा पालेकर, सानिका शिरगावकर, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, विजय गावडे, रमेश कळंबे, संपत मोरे, मोहन परब, महिला शाखा संघटक संजीवनी रावराणे, विद्या खानविलकर, कृतिका शिर्पे, रूपाली शिंदे, पद्मा राऊत, उपलेखापाल रविदास गवळी, तलाठी शेख, यासर पटेल, शरद हरड, प्रकाश मोरे, वनमाला कदम, अक्षता पांचाळ आदी उपस्थित होते.



























































