बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्ला गडावर संवर्धन व स्वच्छता मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लोणावळा

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आई एकविरा देवी गडावर युवा सेना व भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आई एकविरा देवी मंदिरासमोरील पटांगण ते पायऱ्यांपर्यंत, वाहनतळाची स्वच्छता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेनेच्या वतीने गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत. युवा सेना विस्तारक वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ला एकविरा देवी गडावर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, भाविसे संघटक धनंजय नवघणे, युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, समन्वयक विनायक हुलावळे, कुसगाव भाविसे विभाग संघटक राजेश वशिष्ठ, भाविसे वाकसई विभाग संघटक नितिन देशमुख, जांभूळ युवा सेना शाखा अधिकारी मयुर थोपटे, रूपेश येवले, मयुर गेजगे, विशाल घाडगे उपस्थित होते.