
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने १६ ते २० डिसेंबर दरम्यान कार्यकर्ता संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर आणि जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्यापासून झंझावाती सुरूच होत आहे.
उद्या दि.१६ आणि १७ डिसेंबर रोजी चिपळूण तालुक्यात कार्यकर्ता संवाद दौरा होणार आहे.दि.१८ डिसेंबर रोजी लांजा तालुक्यात, १९ डिसेंबर रोजी राजापूर तालुक्यात आणि २० डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यात कार्यकर्ता संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे.या दौऱ्यात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,आजी माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत संवाद साधला जाणार आहे.
गतवैभव मिळवून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज – सहदेव बेटकर
जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी सांगितले की,दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही उद्या पासून संवाद दौरा सुरू करतोय.हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा जिल्हा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी हा रत्नागिरी जिल्हा कायम उभा राहिला आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास शिवसेनेच्याच मुळे झाला आहे त्यामुळे जनता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर भगवा फडकवेल.




























































