Photo – हाती घेऊ मशाल रे… पाप जाळू खुशाल रे..! संभाजीनगरात प्रचाराचा श्रीगणेशा

शिवसेनेच्या मशाल रॅलीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर उजळून निघाले.

क्रांतीचौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला.

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकातून निघालेल्या या रॅलीचे गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर झाले.

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महायुतीच्या धोरणशून्य कारभारावर सडकून टीका केली.

महापालिकेवर गेल्या कित्येक वर्षांपासून डौलाने फडकत असलेला भगवा उतरवण्यासाठी उतावीळ झालेल्या गद्दारांना घडा शिकवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र या, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

या रॅलीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील यांच्यासह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.