
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात अकोला जिह्यात ‘शेतकरी संघर्ष यात्रे’ला आजपासून सुरुवात झाली. मुर्तीजापूर तालुक्यातील संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीतून दापुरा या गावातून संघर्ष यात्रेचा शुभारंभ झाला.
तब्बल 17 दिवस चालणारी ही पदयात्रा जिह्यातील 400 किलोमीटरचा प्रवास करत तब्बल 300 गावांतून जाणार आहे. नापिकी, अवकाळीसह अनेक संकटांना तोंड देत असताना मिंधे सरकारकडून शेतकऱयांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले. 1 रुपया पीक विमा देऊन शेतकऱयांची थट्टा केली गेली. या शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहाणारी ही शेतकरी संघर्ष यात्रा आहे. कापसाला प्रतिक्विंटल 1500 तर सोयाबीनला 10 हजार रुपये भाव देण्याची प्रमुख मागणी घेऊन आजपासून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा मुक्काम दर रात्री शेतकऱयांसमवेत शेताच्या बांधावरच असणार आहे. 21 मार्चला या यात्रेचा समारोप अकोला येथील राजराजेश्वर मंदिरात होणार आहे. यात्रेत भजनी मंडळी, शेतकरी बांधव, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.

























































