
बाणकोट येथील हिम्मतगडावर किल्लावाडी ग्रामस्थ मंडळाकडून मोठया उत्साहात शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीच्या पालखी मिरवणुकीत सादर करण्यात आलेले ऐतिहासिक देखावे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. हा शिवजयंती उत्सव सोहळा पाहण्यासाठी मंडणगड दापोली तालूक्यातील शिवप्रेमी उपस्थित होतेच शिवाय शेजारच्या रायगड जिल्हयातीलही शिवप्रेमींनी उपस्थित राहुन आपला आनंद व्दिगुणीत केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंडणगड तालूक्यातील बाणकोट येथील हिम्मतगड किल्ल्यावर बाणकोट किल्लावाडी वरची आळी येथील ग्रामस्थांनी तिथीप्रमाणे येणारा शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा केला. किल्लावाडी वरची आळी येथील ग्रामस्थांकडून सन 1985 पासून येथे शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. ग्रामस्थांचे शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे हे 38 वे वर्ष आहे. दरवर्षीच येथील ग्रामस्थांकडून विविधप्रकारचे सामाजिक सांस्कृतिक विषयक कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. येथील मुंबईकर चाकरमानी हे एकवेळ शिमगोत्सवाला येत नाहीत मात्र शिवजंयती उत्सव कार्यक्रमाला दरवर्षी आर्वजून येतात.
बाणकोट किल्ला वाडी वरची आळी ग्रामस्थांतर्फे साजरा करण्यात आलेल्या या शिवजयंती उत्सवात बाणकोट किल्ला वाडी येथील अबालवृध्द, महिला, पुरूष, मुंबईकर चाकरमानी आदी अगदी आनंदाने सहभागी झाले होते. या शिवजयंती उत्सवात पारंपारीक ऐतिहासिक देखाव्याचे प्रसंग सादर करून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्सावाला रंगत आणली. यावेळी महिला पुरूषांनी हती लेझिम घेत शिस्तबध्द पध्दतीने वादयाच्या तालावर विविध तालमीतले प्रकार सादर करत धरलेले फेर लक्षवेधी ठरले. दिंडी सोहळयातील क्षणाने तर डोळयांचे पारणेच फेडले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पालखीत बसवून काढयात आलेली पालखी मिरवणुक या पालखी मिरवणुकीत मावळयांच्या हाती दिलेले भगवे निशान, घोडयांवर स्वार झालेले भगव्या फेटयांसह पागडीमधील मावळे त्यात हिम्मतगडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या भगव्या पताका यांनी शिवजयंती उत्सवाचे वातावरण ऐतिहासिक झाले होते. त्यामुळे काही क्षण का ? होईना ईतिहास काळात मन चांगलेच रमुन गेले. हा उत्सव वर्षोनुवर्ष अगदी 38 व्या वर्षीसुध्दा त्याच उत्साहाने सुरू आहे. हे बाणकोट किल्लावाडी वरची आळी ग्रामस्थ मंडळाचे खरे यश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या बाणकोट हिम्मतगड किल्ल्याचे आम्ही रहिवासी आहोत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला वसा. ही महत्वपूर्ण भुमिका साकारण्यासाठी आमच्या वारसांनी स्वतःला या यज्ञ कुडांत वाहून घेत आपले योगदानरूपी बलीदान खर्ची केले.याचा आंम्हास सार्थ अभिमान आहे. त्यांचे वारस या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आंम्ही दरवर्षी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीला साजरी करतो.
> मारूती कुळे, मंडणगड तालूका मुंबई सरचिटणीस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)



























































