
>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट
डोळय़ांचा योग्य पद्धतीने मेकअप केल्यास हीच नेत्र कमले स्त्रीचं व्यक्तिमत्त्व जास्त खुलविण्यास मदत करतात. डोळय़ांचे रंग वेगवेगळे असतात. जसे की काळे हिरवे, करडे, चॉकलेटी तसेच प्रत्येकाच्या डोळय़ांचा आकारही वेगवेगळा असतो. काहींचे डोळे मोठे, लांबट, बारीक, लहान, बदामी, गोल असे वेगवेगळय़ा आकाराचे असतात. डोळय़ांची रंगभूषा करताना किंवा डोळय़ांचा मेकअप करताना डोळय़ांचा आकार नेत्रछटा, भुवया, पापण्या या सगळय़ाचा नीट अभ्यास करून डोळय़ांची रंगभूषा करावी लागते.
आयशाडो – डोळय़ांची रंगभूषा करताना आयशाडोला फार महत्त्व आहे. आयशाडोमुळे डोळय़ांचा मूळ रंग जास्त प्रकर्षाने उठून दिसतो. आयशाडो हे वेगवेगळय़ा रंगात उपलब्ध असतात. अलीकडे लाईट कलरच्या, डार्क कलरच्या, न्यूट्रल, ग्लिटर अशा वेगवेगळय़ा शेडच्या आयशाडो उपलब्ध असतात. डोळय़ांच्या आकारात कमी-जास्त, बारीक-मोठा असा बदल दाखविण्याचे काम हे आयशाडो उत्तम प्रकारे करू शकतात. ज्या रंगाचा पोशाख त्या रंगाची आयशाडो वापरणे उत्तम. तरीही अलीकडे ग्लिटर, मिक्स-मॅच आयशाडो वापरण्याची पद्धत आहे.
आयब्रो पेन्सिल – कमानदार भुवया सौंदर्यात भर घालतात. भुवईचा आकार तिचा दाटपणा लक्षात घेऊन त्या रंगवाव्या लागतात. त्यासाठी आयब्रो पेन्सिल ही नुसती, डार्क काळय़ा रंगाची किंवा ब्राऊन आणि ब्लॅक तसेच डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन अशीही मिळते. तुम्ही पावडर केकही वापरू शकता. नाकाजवळील टोकापासून सुरुवात करून पुढे जाड रेषा ठेवून टोकाशी बारीक करत न्यावी. गालाचे उंचवटे जर जास्त असतील तर भुवईला आकार देताना नाकाच्या सरळ रेषेपासून सुरुवात न करता नाकाच्या रेषेच्या थोडय़ा मागून सुरुवात करावी. त्यामुळे गालाचे उंचवटे कमी भासतील.
आयलॅसेस – पापण्या म्हणजे आयलॅसेस मोठय़ा तेकढा डोळ्यांचा आकारही काढतो, डोळे सुंदर दिसतात.
आयलायनर – डोळय़ांची रंगभूषा करताना जेवढं महत्त्व आयशॅडोला आहे तेवढेच महत्त्व आयलाइनरलादेखील आहे. डोळय़ांच्या रंगाप्रमाणे आयलायनरच्या रंगाची निवड करणे अतिशय सोपे झाले आहे. तुमचे डोळे जर काळेभोर असतील तर काळय़ा गडद तपकिरी करडय़ा रंगाची निवड करावी. जर तुमचे डोळे फिकट, लाईट ब्राऊन, ग्रे असे असतील तर आयलाईनरची निवड करताना फिक्या रंगाचे आयलाईनर वापरावे. जसं लाईट ब्राऊन, लाईट ग्रे, लाईट करडा असे रंग तुम्ही वापरू शकता. डोळय़ांचा आकार लक्षात घेऊन आयलायनर लावावे.
मस्कारा – डोळ्याच्या पापण्यांकर लाकण्यासाठी मस्काराचा कापर करू शकता. मस्कारा रोलोन ब्रशच्या स्वरूपात मिळतो. तो वापरताना पातळ वापरावा नाहीतर त्याचे कण पापणीच्या केसांवर राहिल्यास ते फार वाईट दिसते. आपल्या नॉर्मल पापण्यांवर मस्कारा लावून मग त्यावर या पापण्या लावल्यास त्या नीट बसतात. तयार आयलॅशेस लावताना आयलॅशेस ग्लूचा वापर करावा.
डोळय़ांचा मेकअप केल्यानंतर तो तेवढय़ाच आठवणीने नीट पुसून काढणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी मेकअप रिमूवर बेबी ऑइल वापरून तुम्ही मेकअप काढू शकता. डोळय़ांच्या भोवतालची त्वचा अत्यंत नाजूक व मुलायम असते. त्यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी मेकअप तसाच राहिल्यास ती लवकर सुरकुतण्याची शक्यता असते किंवा ड्राय पडण्याची शक्यता असते. मेकअप काढून झाल्यावर अशाप्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या डोळय़ांना आरामही मिळतो आणि डोळे तजेलदारही दिसतात. अनेक वेळा डोळय़ांसाठी वापरणारी प्रसाधने इतरांशी शेअर करू नये. कारण डोळे हे नाजूक इंद्रिय असल्यामुळे आपल्या वस्तू दुसऱयांनी वापरल्यावर त्यांचा एखादा डोळय़ांचा आजार आपल्यालाही होऊ शकतो. त्यासाठी नेहमी निदान डोळय़ांच्या आरोग्यासाठी तरी आपला पर्सनल किट वापरावा.
































































