
देशभर दिवाळी उत्साहात साजरी होत असताना किल्ले रायगडावर मात्र अंधार पसरलेला असतो. त्यामुळेच, ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी आणि त्यानंतर आपल्या घरी’ असा निश्चय करून गेली अनेक वर्ष नित्यनेमाने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शितभक्त किल्ले रायगडावर दीपोत्सव साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देतात. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगढ़ संस्थेच्या वतीने सलग 14व्या वर्षी ‘शिवचैतन्य सोहळा’ साजरा केला यावेळीची काही छायाचित्रे.