मागण्यापेक्षा मरण पत्करेन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी भाजप पक्षश्रेष्ठींनी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशात अनेक इच्छुकांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘मी स्वतःसाठी काही मागण्यापेक्षा मरण पसंत करेन’ असे विधान शिवराजसिंह चौहान यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर मध्य प्रदेशातील भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.