सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, शिवसेनेचे गृहमंत्र्यांना पत्र

361
shivsena-logo-new

काँग्रेसप्रणीत एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आवारात घुसून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. अशा प्रकारचे दुष्कृत्य करणाऱया या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी केलेले हे कृत्य अमानवी असून हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱया थोर महापुरुषांचा तसेच ब्रिटिशांविरोधात तीव्र लढा उभारणाऱया स्वातंत्र्यसैनिकांची या घटनेमुळे बदनामी झाली आहे. सावरकर, महात्मा गांधींची बदनामी झाली असून या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱया एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या