डॉ. मनोहर जोशी यांना ‘डी. लिट’ पदवी प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मनोहर जोशी यांना आज डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डी. लिट’ या सन्माननीय पदवीने गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी स्वतः भेट घेऊन ही पदवी डॉ. जोशी यांना प्रदान केली. राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी मनोहर जोशी यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पदवी मिळाल्यानंतर मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली.

manohar-joshi-degree1

“जीवनात मी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्याची या विद्यापीठाने दखल घेतल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो; तसेच डी. वाय. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसम्राटांच्या हस्ते ही पदवी प्रदान होणं हे माझं भाग्य आहे.” या शब्दांत डॉ. जोशी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पदवीप्रदान प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. शिरीष पाटील व डॉ. जोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.