गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 1993 साली दंगल झाली तेव्हा शिवसेनेने मुंबई वाचवली. बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचे व ती फोडण्याचे पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या गद्दारांनी शिवसेनेल शिकवू नये असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठण येथील सभेत केलेल्या टीकेचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याचे पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केलं. ज्या पद्धतीने
दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ होवो असा घणाघात दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केला.

‘सामना’वर टीका करताना सांभाळून

‘सामना’ वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली. त्यामुळे ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना सांभाळून बोलण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री नारायण राणे हे मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना, अशा धमक्या देत आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोक अशा प्रकारे उघडपणे धमक्या देत दादागिरी करत असतील तर गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शिंदे-फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.