
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर शिवसेनेच्या वतीने गोरगरीब होतकरु नागरिकांना ब्लॅकेट अन साड्यांचे वाटप करण्यात आले.
सेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, दैनिक सामनाचे प्रतिनिधी सुनील उंबरे, अर्बन बँकेचे संचालक हरिभाऊ ताठे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रवी मुळे, माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे, उपशहर प्रमुख विनय वनारे, तानाजी मोरे, पोपट सावंतराव, सचिन बंदपट्टे, ईश्वर साळूखे, सूरज गायकवाड, चारुदत्त बनसोड, सिध्दनाथ कोरे आदी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ उद्यानात कोरोनाचे नियम पाळून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनाथ, निराधार आणि गोरगरीब कुटूंबांना अल्पोपहार आणि ब्लँकेट व साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी शिवसेना प्रमुखांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रमुखांच्या नाम घोषाने परिसर दणाणून गेला.


























































