शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । धाराशिव

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भाजप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या रविवार, 14 एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची धाराशिव येथे जाहिर सभा होणार आहे. शहरात असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या पाठिमागील मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्या रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे हेलीकॉप्टरने सोलापूरहून धाराशिवला येणार असून सभा संपल्यानंतर मुक्कामासाठी ते सोलापूर येथे जाणार आहेत. दरम्यान या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आज शिवसेना उपनेते तथा जिल्हासंपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी या तयारीची पाहणी करुन योग्य त्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत शिवाजीराव सावंत, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेस महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपनेते तथा जिल्हासंपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे.